Loading...

एक खिडकी प्रणाली

"Ease of Doing Business" अंतर्गत मुंबई व मुंबई उपनगरातील चित्रपट, टि. व्ही. मालिका, जाहिरातपट व माहितीपट इत्यादींच्या चित्रिकरणासाठी लागणाऱ्या विविध विभागांच्या परवानग्या सुलभरीतीने व ठराविक मुदतीमध्ये मिळाव्यात यादृष्टीने एक खिडकी प्रणाली सुरु करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य विभाग, शासन निर्णय दिनांक: २२ मे २०१८ नुसार घेण्यात आलेला आहे.

यासाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची "संनियंत्रण संस्था" म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रिकरणाच्या परवानगीसाठी एक खिडकी प्रणालीचा विस्तार सांस्कृतिक कार्य विभाग, शासन निर्णय दिनांक: ०४ मार्च २०२२ नुसार करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय/निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था / महामंडळे इत्यादी आस्थापनांच्या नियंत्रणाखालील अनुज्ञेय असलेल्या खुल्या जागेवर चित्रीकरण नि:शुल्क उपलब्ध करुन देण्याबाबतचा निर्णय सांस्कृतिक कार्य विभाग, शासन निर्णय दिनांक: १६ मार्च २०२४ नुसार घेण्यात आलेला आहे.

चित्रपट, जाहिराती, टीव्ही मालिका, प्रवासवर्णन, वेब सिरीज, माहितीपट, लघुपट, म्युझिक अल्बम, इत्यादी चित्रिकरणांच्या परवानग्या एकाच ठिकाणी या प्रणाली मार्फत दिल्या जातात.