


महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळची एक खिडकी प्रणाली साठी सनियंत्रण संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, ज्याला चित्रनगरी म्हणून संबोधले जाते, ती भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने सुद्धा ओळखली जाते.
चित्रनगरी मध्ये 16 वातानुकूलित तसेच ध्वनिरोधक सुविधा असलेले अद्यावत स्टुडिओ (कलागारे), सुमारे 70 निसर्गरम्य बाह्यचित्रिकरण स्थळे, वीज, पाणी व प्रशिक्षित सहाय्यक कर्मचारी उपलब्ध आहेत
फिल्मसिटीची ठळक वैशिष्ट्ये:-
16 प्रशस्त इनडोअर स्टुडिओ
70 निसर्गरम्य बाह्यचित्रिकरण स्थळे
521 एकर निसर्गरम्य जागा
90 मेकअप रूम
हेलिपॅड, तलाव, मंदिर, न्यायालय इ. चित्रिकरण स्थळे
अधिक माहितीसाठी कृपया www.filmcitymumbai.org ला भेट द्या